"अखंड सेवा, सक्षम नागरिक"

आमची यशोगाथा

1.  गावाविषयी माहिती

घिवंडा हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील १००% आदिवासी लोकवस्ती असलेले  प्रगतशील  गाव आहे. घिवंडा पैकी बोंडारपाडा येथे प्रसिद्ध गाव देवी मंदिर आहे सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे १९२४ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ५, अंगणवाडी केंद्रे ७ व ,सभामंडप आणि बहुउद्देशीय केंद्र -१ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच ०२  मंदिरे, सामुदायिक सभागृह ००, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

2.   गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून,भात,नागली व वरई ही प्रमुख पिके घेतली जातात. काजू व आंबा या फळपिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते

3.   घिवंडा ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घिवंडा गावाने सार्वजनिक शौचालय १ आहे.

4.    ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच व ८ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

5.    घिवंडा गाव आज जव्हार तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

2. भौगोलिक स्थान

हे गाव जव्हार तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे १४ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ ३६४.६४.०५ हे आर  असून ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत. एकूण ७१८  कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या १९२४ आहे. त्यामध्ये १००० पुरुष  ९२४ महिला यांचा समावेश होतो.ग्रामपंचायत घिवंडा हद्दीत १महसुली गावे व ७ पाडे आहेत.सर्व गाव पाडे हे विखुरलेल्या स्वरूपात असून ग्रामपंचायत मुख्यालयापासून २००m अंतरापर्यंत वसलेले आहेत.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने डोंगराळ प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन कमी प्रमाणात आहे.तसेच  गावालगत अवघ्या १ किमी अंतरावर वाघ नदी आहे. खडखड धरण ,वाघ नदीला त्याचे पाणी येत असते  आणि बेहेड  ओहोळ वाहत जात असून पुढे  वावर वांगणी जवळ लेंडी नदीला जावून जाऊन मिळतात तसेच बोडारपाडा गावालगत वाघ  नदी वाहत असते त्या नदीच्या पाण्याचा वापर शेतीसाठी केला जातो.

3. लोकजीवन

घिवंडा गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून मिरची,काजू,आंबा, व हंगामी भात,नागली,वरई पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात.

प्रशासकीय संरचना


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा...

लोकसंख्या आकडेवारी


718
1924
1000
924

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo