आमची यशोगाथा
1. गावाविषयी माहिती
घिवंडा हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील १००% आदिवासी लोकवस्ती असलेले प्रगतशील गाव आहे. घिवंडा पैकी बोंडारपाडा येथे प्रसिद्ध गाव देवी मंदिर आहे सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे १९२४ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ५, अंगणवाडी केंद्रे ७ व १,सभामंडप आणि बहुउद्देशीय केंद्र -१ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच ०२ मंदिरे, सामुदायिक सभागृह ००, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
2. गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून,भात,नागली व वरई ही प्रमुख पिके घेतली जातात. काजू व आंबा या फळपिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते
3. घिवंडा ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घिवंडा गावाने सार्वजनिक शौचालय १ आहे.
4. ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच व ८ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
5. घिवंडा गाव आज जव्हार तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.